adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी मुले बनली रँचो; बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले विविध प्रयोग

आदिवासी मुले बनली रँचो; बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले विविध प्रयोग  यावल/ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एकात्मिक आदि...

आदिवासी मुले बनली रँचो; बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले विविध प्रयोग 


यावल/ चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय आदिवासी प्राथमिक आश्रमशाळा मालोद ता.यावल येथे दिनांक १३ जानेवारी वार मंगळवार रोजी पार पडले. यावेळी मुख्याध्यापक जी.सी.कटारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे, हातेड येथील प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, विज्ञान शिक्षक भूपेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जलतारा, पाणी व्यवस्थापन, शाश्वत शेती, सोलर एनर्जी, मृदा संधारण, हिंस्त्र पशू पासून संरक्षक कपडे, उपाययोजनात्मक बूट, रस्ते अपघात, पवन चक्की, सौऊर्जेवर धावणारे वाहन, वायू चूल, अशा नानाविध प्रकारचे प्रयोग व त्याचे प्रात्यक्षिक आदिवासी मुलांनी यावेळी सादर केले.

सदर प्रदर्शनासाठी अनंत पाटील, मनीषा पाटील, विजय पालीवाल,जगदीश सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. चोपडा बीटातील प्राथमिक विभागातून तीन व माध्यमिक विभागातून तीन बक्षिसे यावेळी देण्यात आली. चोपडा बीट समन्वयक नरेंद्र देसले, व्ही.डी.राठोड तसेच विविध शाळांचे विज्ञान शिक्षक आणि मालोद येथील प्राथमिक आश्रमशाळेतील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

No comments