श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस येथे जिजाऊ –विवेकानंद जयंती उत्साहात साजरी शहादा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक १२ जानेव...
श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस येथे जिजाऊ –विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
शहादा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १२ जानेवारी रोजी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस येथे राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्या. किरण पाटील जेष्ठ शिक्षक पी आर पाटील, भरत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.
इयत्ता आठवीची विद्यार्थिनी मानसी विठ्ठल मराठे हिने “मी जिजाऊ बोलते” ही एकांकिका सादर केली, तर साई गोरख भिल याने स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत प्रभावी सादरीकरण केले.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या २५ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. रजनी पटेल यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी, तर परेश पटेल यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सोनवणे यांनी केले व जयेश पाटील यांनी आभार मानले. आयोजनासाठी जयदेव पटेल, खगेंद्र कुंभार व सिताराम ठाकरे यांचे सहकार्य लाभले.

No comments