प्रमिला जी.निकम कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार; राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ! संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. (सं...
प्रमिला जी.निकम कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार; राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण !
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्राती, या सणाच्या अनुषंगाने माझ्या सर्व हितचिंतकांना मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा.
नवीन वर्षांमध्ये मकर संक्रती सणाच्या अनुषंगाने जगरूकतेचा नवीन संदेश :-
सायबर जगतातील गंभीर धोका :- महिलांचे सेक्स्टॉर्शन
डिजिटल युगात सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढत असताना सायबर गुन्हेगारीचे प्रकारही झपाट्याने वाढत आहेत. त्यापैकी महिलांना लक्ष्य करून केला जाणारा सेक्स्टॉर्शन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. या गुन्ह्यात सायबर गुन्हेगार फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा डेटिंग अॅपवर व सोशल मीडिया च्या कोणत्याही माध्यमांतून आकर्षक बनावट प्रोफाइल तयार करून महिलांशी मैत्री करतात.व सुरुवातीला महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना भावनिक आधार आणि सहानुभूती देवून मानसिकदृष्ट्या जवळ केले जाते.
नंतर खासगी चॅट,फोटो किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद केला जातो. अनेक वेळा समोरची व्यक्ती प्रत्यक्ष नसून पूर्व-रेकॉर्डेड व्हिडिओ चा वापर केला जातो. या संभाषणाचे गुपचूप रेकॉर्डिंग करून “हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवू”, “सोशल मीडियावर टाकू” अशा धमक्या देऊन पैशांची मागणी केली जाते. एकदा पैसे दिल्यानंतर मागण्या वाढतच जातात आणि मानसिक त्रास अधिक वाढतो. काळजी करु नका, मार्ग आपण काढू अशा प्रकारात लाज वाटण्याचे कारण नाही, कारण हा पूर्णपणे गुन्हा आहे. महिलांनी कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन संपर्कात असलेल्या व्यक्ती किंवा सोशल मीडियावर खासगी माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत.
कोणत्याही सोशल मीडियाच्या विविध ऍप वरून चेहरे बदलून अश्लील व्हिडिओ बनविणे आणि त्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेलिंग करणे असें प्रकार होताना दिसत आहेंत.अश्या प्रकारच्या घटनेला सामाजिक, राजकीय, सामान्य नागरिक देखील बळी पडले आहेत. अश्या घटना मी स्वतः पोलीस खात्यात कार्यरत असल्यामुळे नेहमी पहात आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियाला अश्या प्रकारचे ऍप घेत असतो, त्यावेळी तुमच्याकडून अनेक प्रकारच्या परमिशन मागितल्या जातात.उदा. तुमचे गुगल लोकेशन,तुमची फोटो गॅलरी, डेटा किंवा कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी. आणि आपण त्यांना सहज पणे परमिशन देतो.
तुमचा चेहरा बायोमॅट्रिक पद्धतीने सुंदर करून तो सोशल मीडियावर प्रसारित करून त्याला like मिळतात. पण आपण नकळत सर्व माहिती हॅकर्स ला देत असतो, आणि आपले नुकसान करून घेतो. सायबर गुन्हेगार हे A I (आर्टिफिशिंअल इंटीलीजन्स)चा वापर करून बनावट चेहऱ्याचा आधार घेऊन अश्लील व्हिडिओ तयार करणे किंवा व्हिडीओ कॉल करणे, आपला हुबेहूब आवाज काढणे असें प्रकार घडलेले आपण पाहतो. या सेक्स्टोर्शन चा मुख्य उद्देश हा पैसे उकलणे व बदनामी करणे हा आहे.
त्यामुळे सोशल मीडियाचा वापर आपण खुप काळजीपूर्वक करावा. भविष्यात अशा प्रकारचे अनेक ऍप बनविले जातील. आपण फसतो म्हणूनच हॅकर्स नवीन ऍप करून आपल्याला फसवितात, हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा.अशा प्रकारच्या सायबर ऍक्टिव्हिटीला बळी पडू नका.
तरीही नकळतपणे अश्या प्रकारच्या घटना घडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करणे अत्यावश्यक आहे. जागरूकता आणि वेळेवर तक्रार हीच या सायबर गुन्ह्यांवर प्रभावी उपाययोजना आहे. आनंदी रहा, मस्त रहा,सुरक्षित रहा, जागरूक रहा.
जयहिंद,जय महाराष्ट्र
पुणे ग्रामीण पोलीस!

No comments