adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी गोसावी यांची सांगली जिल्हा पोलीस दलात बदली !

 कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी गोसावी यांची सांगली जिल्हा पोलीस दलात बदली !  सौ. शुभांगी-पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रति...

 कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी गोसावी यांची सांगली जिल्हा पोलीस दलात बदली ! 


सौ. शुभांगी-पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कोल्हापूर परिक्षेत्रातील बुधवारी रात्री उशिरा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशावरून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या त्या त्या जिल्ह्यात कार्यकाळ पूर्णता: झालेल्या अशा पोलीस  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. स्नेहा गिरी गोसावी यांची सांगली जिल्हा पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशात बदली करण्यात आली आहे. सौ. स्नेहा गिरी गोसावी या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात कार्यात होत्या. त्यांनी तेथे वाहतूक शाखा पन्हाळा करवीर अशा विविध पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील त्यांचा कार्यकाळ हा पूर्णता: झाल्यामुळे त्यांना सांगली जिल्हा पोलीस दलात पदस्थापना देण्यात आली आहे. सौ. स्नेहा गिरी या कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्रधान्य देणाऱ्या आणि कर्तव्यदक्ष डॅशिंग लेडी सिंघम महिला पोलीस अधिकारी म्हणून गिरी यांना पोलीस खात्यात चांगलेच ओळखले जाते. लवकरच त्या सांगली जिल्हा पोलीस दलात रुजू होणार आहेत. आदरणीय मॅडम यांचे रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुपच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.

No comments