adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उषाताई वनारे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार प्रदान

 उषाताई वनारे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार प्रदान  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 उषाताई वनारे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार प्रदान 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात दीर्घकाळ निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या उषाताई वनारे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. समाजातील वंचित, गरजू, महिला व बालकल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.उषाताई वनारे यांनी शिक्षणप्रसार, महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती तसेच गरजू घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून दिला जाणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार सेवाव्रती व्यक्तींसाठी प्रेरणादायी मानला जातो. पुरस्कारामध्ये मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन उषाताई वनारे यांचा गौरव करण्यात आला.या पुरस्कारामुळे आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उषाताई वनारे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments