चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : चोपडा नगरपरिष...
चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांवर नगरपरिषद सदस्यांचे नामनिर्देशन तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुकीसाठी सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ११.०० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा मा. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार चोपडा श्री. भाऊसाहेब थोरात सो. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या विशेष सभेस नगरपरिषदेच्या अध्यक्ष सौ. पाटील नम्रता सचिन, उपाध्यक्ष श्री. बोरोले पंकज सुरेश, गटनेते श्री. योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी, श्री. रमाकांत नथु ठाकुर, श्री. गजेंद्र अरविंद जैस्वाल, श्री. देशमुख हितेंद्र रमेश यांच्यासह एकूण ३४ नगरसेवक उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर, उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर, सभा अधिक्षक श्री. संजय ढमाळ, श्री. अनिल चौधरी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
मा. पिठासीन अधिकारी यांच्या कडे मुख्याधिकारी मार्फत विषय समित्या व सभापती पदासाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नगरपरिषदेच्या विषय समित्यांची रचना व सभापती पदांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नगरपरिषदेच्या विषय समित्यांची नावे :
१) सार्वजनिक बांधकाम समिती
२) शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती
३) स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती
४) पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
५) नियोजन व विकास समिती
६) महिला व बालकल्याण समिती
विषय समित्यांचे सभापती पुढीलप्रमाणे :
- स्थायी समिती – सौ. पाटील नम्रता सचिन (अध्यक्ष)
- सार्वजनिक बांधकाम समिती – पठाण हुसेनखा अयुबखा
- शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती – श्री. पाटील अमोल साहेबराव
- स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती – श्री. शिंदे रमेश ग्यानोबा
- पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – श्री. चौधरी किशोर रघुनाथ
- नियोजन व विकास समिती – श्री. बोरोले पंकज सुरेश (उपाध्यक्ष)
- महिला व बालकल्याण समिती – सौ. माळी देवयानी पवन
नगरपरिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती, तर उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्यानंतर दुपारी ३.५० वाजता सभा संपल्याचे जाहीर करत मा. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार चोपडा यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.

No comments