भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भगि...
भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ चोपडा संचालित समाजकार्य महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव च्या वतीने परमश्रध्देय गोवर्धनदास भिकारी दास उर्फ बाबाजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. हे वकृत्व स्पर्धेचे 21 वर्ष असून यावर्षी आयोजित स्पर्धेसाठी एकूण 24 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक श्री आशिष अरुण भाई गुजराथी यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रताप विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक श्री अवधूत अनंत ढबू व प्रताप विद्या मंदिराचे पर्यवेक्षक श्री अतुल भट हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगिनी मंडळ चोपडा या संस्थेच्या अध्यक्षा सौ पूनम आशिष गुजराथी या होत्या. विशेष अतिथी म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.छायाबेन अरविंद भाई गुजराथी व संस्थेच्या सहसचिव अश्विनी प्रसन्ना लाल गुजराथी या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौंदाणकर व उपप्राचार्य डॉ आशिष गुजराथी तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेले श्री मेहुल पाटील सर श्री संजय बारी सर श्री भालचंद्र पवार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते परम श्रद्धेय गोवर्धनदास भिकारी दास उर्फ बाबाची यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा डॉ अनंत देशमुख यांनी मांडले त्यानंतर उद्घाटनपर भाषणात प्रसिद्ध उद्योजक श्री आशिष अरुण लाल गुजराथी यांनी बाबाजींच्या कार्याविषयी तसेच या स्पर्धे साठीचा प्रत्येक विषय आजच्या काळात अतिशय समर्पक आहेत असे आपल्या मनोगत व्यक्त केले. नंतर प्रमुख पाहुणे श्री अवधूत ढबू सर यांनी या स्पर्धेविषयी आपल्या गाण्यातून मत व्यक्त केले दुसरे प्रमुख पाहुणे प्रताप विद्या मंदिराचे पर्यवेक्षक श्री अतुल भट सर यांनी बाबाजींच्या महानकार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला. त्यानंतर स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रा गोपाल बडगुजर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ विनोद रायपुरे यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेसाठी एकूण 24 स्पर्धेकांनी सहभागी नोंदवला होता. त्यामध्ये प्रताप महाविद्यालय, अमळनेर डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, दादासाहेब सुरेश जी पाटील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, धुळे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा, समाजकार्य महाविद्यालय चोपडा, कला व वाणिज्य महाविद्यालय चोपडा इत्यादी महाविद्यालयातील एकूण 24 विद्यार्थी स्पर्धकांनी स्पर्धेक म्हणून सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षेक म्हणून श्री संजय बारी सर महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चोपडा, श्री मेहुल पाटील सर, सी बी निकम हायस्कूल, घोडगाव, श्री भालचंद्र पवार , आश्रम शाळा सत्रासेन यांनी काम बघितले. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रताप महाविद्यालय अमळनेर ची विद्यार्थिनी कु. सायली युवराज पाटील हिने पटकावले तर द्वितीय क्रमांक चे बक्षीस डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील अनिल ज्ञानेश्वर बागुल या विद्यार्थ्याने पटकावले तृतीय क्रमांकाचे बक्षीस भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी यश मोतीलाल माळी याने पटकावले तर उत्तेजनार्थ म्हणून दिलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रिया बळीराम पवार, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज धुळे हिने , द्वितीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस अखिलेश मनोज पाटील प्रताप महाविद्यालय अमळनेर याने, तृतीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा कविता रामचंद्र माळी हिने तर चतुर्थ क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील विश्वजीत वाघ यांनी प्राप्त केले. या पारितोषकांचे वितरण श्री वसंतलाल गोवर्धन दास शाह व संस्थेच्या सहसचिव श्रीमती अश्विनी प्रसन्न लाल गुजराथी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक स्पर्धकाचे अभिनंदन प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परीक्षकांचे मनोगत व सहभागी स्पर्धकांचे मनोगत सुद्धा झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित आमचे व मान्यवरांचे आभार मानून वंदे मातरम या राष्ट्रगीताने या अंतर महाविद्यालय स्पर्धेची सांगता झाली. या प्रसंगी आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा अनिल बाविस्कर यांनी केले. या 21 व्या आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर सौदांणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आशिष गुजराथी यांच्या समन्वयातून समाजकार्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतलेत

No comments