वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालय ता. अहमदपूर अंतर्गत वनपरिमंडळ ता. चाकुर यांची चौकशी करण्याची भिम आर्मीची मागणी लातूर जिल्हा प्रतिनिधी (संपादक...
वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालय ता. अहमदपूर अंतर्गत वनपरिमंडळ ता. चाकुर यांची चौकशी करण्याची भिम आर्मीची मागणी
लातूर जिल्हा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर :- वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालय ता. अहमदपूर अंतर्गत वनपरिमंडळ ता. चाकुर वनपाल व वनरक्षक रोजगारसेवक संगणमताने झरी (खु.) चापोली तीर्थवाडी बडवळ नागनाथ वनविभाग रोपवाटीका वर बोगस मजुर लावून लाखोंचा भ्रष्टाचार करीत असल्या बाबतची तक्रार भिम आर्मी तालुकाध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांचे कडे केली असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
उपरोका विषयी निवेदन सादर करतोय की, रोपवाटीकेवर रोजगार सेवक, वनरक्षक, वनपाल यांच्या संगणमताने बोगस मजूर लावून काम करीत आहेत. मस्टरला वीस ते बावीस मजूर असतात व प्रत्यक्षात कामाला आठ ते दहाच मजुर असतात व हजेरी सर्वच मजुरांची प्रत्यक्ष मस्टरला घेतली जाते व आठ ते दहा मजुर फोटोत असतात तसेच बारा मजुरांची हजेरी त्याच फोटोवर भरली जाते बारा मजुरांचा फोटो कधीच निदर्शनास येत नाही व एकच फोटो दुसऱ्या मस्टरला टाकतात व फोटो काढून निघुन जातात. मात्र प्रत्यक्षात सात ते आठ मजुर कामाला असतात. तसेच मजुर कामाला असतात. तसेच मजुराच्या काम मागणीवर मस्टरवर रोजगार सेवकांची सही व शिक्के संबंधित अधिकारी करतात. तरी मा. साहेबांनी रोजगार सेवकाचा सही नमुना तपासण्यात यावा व वरील अधिकाऱ्यांची रितसर चौकशी करुन वनरक्षक, वनपाल, रोजगार सेवक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात या आपल्या कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकावर सह्या केल्या आहेत


No comments