adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य सेनानी बॅरिस्टर वीर भाई कोतवाल पुण्यतिथी साजरी.

स्वातंत्र्य सेनानी बॅरिस्टर वीर भाई कोतवाल पुण्यतिथी साजरी. नवनियुक्त नगराध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...

स्वातंत्र्य सेनानी बॅरिस्टर वीर भाई कोतवाल पुण्यतिथी साजरी.

नवनियुक्त नगराध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:--दि.२ जानेवारी रोजी श्री संत सेना नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हुतात्मा बॅरिस्टर वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील ह्या होत्या तर अध्यक्षस्थानी माजी सैनिक अविनाश त्र्यंबक साळुंखे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज, वीर जिवाजी महाले, बॅरिस्टर वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांचा सत्कार श्री संतसेना नाभिक समाजाचे अध्यक्ष उमाकांत मधुकर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नवनियुक्त नगरसेवक अमोल साहेबराव पाटील, भारती सुनील चौधरी, हुसेन पठाण, अकील जाहगीरदार, मा.उपनगराध्यक्ष विकास पाटील आणि नायब तहसीलदार शिरीष सैंदाणे, सुनील चौधरी, श्याम परदेशी, संजय जैन, व उद्योजक सचिन रविंद्र पाटील हे उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवकांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

       यावेळी नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी वीर भाई कोतवाल यांचा जीवनपट सांगून स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान सांगितले. श्री.संत नाभिक संस्थेचे अध्यक्ष यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडला नवनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांना ही भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आणि वीर भाई कोतवाल यांच्या जीवनावर माहिती सांगितली. यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. लोकशाहीचे पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी वीर भाई कोतवाल यांचे शिक्षण आणि देशासाठी त्यांचे योगदान यावर मार्गदर्शन केले.
      हा कार्यक्रम श्री संत सेना नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मधुकर निकम, उपाध्यक्ष राहुल भीमराव निकम, शत्रुघ्न सोनवणे (सचिव), राजेंद्र फकिरा येशी (खजिनदार), राजेंद्र अभिमन सोनगिरे, दीपक पंजाबराव साळुंखे, भरत देवराम जाधव, महेंद्र रामचंद्र सैदाणे, विलास पांडुरंग निकम यांनी आयोजित केला होता. यावेळी थोर सेनानी वीर भाई कोतवाल यांच्या स्मारकास ही अभिवादन करण्यात आले.
      यावेळी कार्यक्रमास संजय रामभाऊ निकम, सुनील सोनगिरे, अर्जुन पुंडलिक निकम, लक्ष्मण सैंदाणे, मनोहर बन्सीलाल सोनगिरे, सोपान काशिनाथ बाविस्कर, ज्ञानेश्वर रामदास सोनवणे, अनिल नारायण पवार, सुभाष भिला सैंदाणे, हिरालाल सोनवणे, किशोर सैंदाणे, धनराज त्र्यंबक पगारे, देविदास सुखदेव बाविस्कर, अनिल सैंदाणे, प्रमोद भटू सोंनगीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत निकम, राजेंद्र येशी, राहुल निकम यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. तर आभार रवींद्र सैंदाणे यांनी मांडले.

No comments