मानव सेवा प्राथमिक विद्यामंदिरात शेकोटीच्या उपक्रमातून आनंदही शिक्षणाच्या जागर जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विद्यार्थ...
मानव सेवा प्राथमिक विद्यामंदिरात शेकोटीच्या उपक्रमातून आनंदही शिक्षणाच्या जागर
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी मानव सेवा मंडळ, जळगांव संचलित प्राथमिक विद्या मंदिरात आनंददायी शनिवार, कब बुलबुल आणि मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत शेकोटी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
कडाक्याच्या थंडीत निसर्गाच्या सानिध्यात आणि शेकोटीच्या उबदार प्रकाशात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले . यावेळी शाळेतील प्रगत मास्तर सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून विविध कृतीयुक्त शेकोटी सादर केली.त्यात नाच रे मोरा, शाळेच्या बागेत, जळगांव चा म्हातारा शेकोटी ला आला चार मेंढक घुमणे चले, जय बजरंगा खा गुळ शेगा, एक दो बल्ले बल्ले तसेच शिक्षक मनोज बावस्कर यांनी लसन की चटणी, लई मजेदार हे आनंददायी गाणी विद्यार्थ्यांत कडून म्हणून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये खेळ आणि बाह्य साद्याव्दारे टिमवर्क सहकार्य वृत्ती, शिस्त आणि सेवाभाव या सारख्या गुणाची रुजवण होण्यास मदत होते. देशसेवा तसेच आपल्या कर्तव्याची सातत्याने जाणीव होते म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी कब बुलबुल या कार्यक्रम विषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले .यावेळी सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी देखील विद्यार्थ्यांना सोबत गाणी, नृत्य सादर करुन कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया तसेच सचिव विश्वनाथ जोशी यांनी कौतुक केले.


No comments