सांगलीच्या पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात संपवलं आयुष्य, कोणासही जबाबदार धरू नये, सुसाईड नोट सापडली ! संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी...
सांगलीच्या पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात संपवलं आयुष्य, कोणासही जबाबदार धरू नये, सुसाईड नोट सापडली !
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुण्यात पोलीस प्रशासन विभागाला हदरवणारी घटना समोर आली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पुण्यातील एका लॉजवर विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. सुरज मराठे (वय 25) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. सुरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगांव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरज मराठे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देहू येथील रहिवासी आहेत. त्यांनी नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदाचा (प्रोबेशन परिवीक्षधीन) कालावधी पूर्णता केला होता. महिनाभरांपूर्वी त्यांची तासगांव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. मराठे हे अविवाहित होते. गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने ते 30 डिसेंबर पासून वैद्यकीय रजेवर होते. मंगळवारी डेक्कन परिसरांत आपटे रस्त्यावरील एका लॉजवर त्यांनी खोली घेतली होती. दुसऱ्या दिवशी बुधवार पर्यंत खोलीचा दरवाजा बंदच राहिल्याने हॉटेल व्यवस्थापकांने ही बाब पोलिसांना कळवली. माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरवाजा उघडून पाहणी केली असता सुरज मराठे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दरम्यान आत्महत्येपूर्वी मराठे यांनी एक चिठ्ठी लिहिल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये, वैयक्तिक वैद्यकीय असं चिठ्ठीत त्यांनी नमूद केले मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांच्या मृत्यूची नोंद ही डेक्कन पोलीस ठाण्यात झाली आहे.

No comments