adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला..! प्रभाग ६ मधून करण उदय कराळे व प्रभाग ७ मधून पुष्पाताई अनिल बोरूडे बिनविरोध विजयी

 अहिल्यानगर महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला..! प्रभाग ६ मधून करण उदय कराळे,सोनाबाई तायगा शिंदे व प्रभाग ७ मधून पुष्पाताई अनिल बोरूडे बिनविरोध ...

 अहिल्यानगर महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला..!

प्रभाग ६ मधून करण उदय कराळे,सोनाबाई तायगा शिंदे व प्रभाग ७ मधून पुष्पाताई अनिल बोरूडे बिनविरोध विजयी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-  महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून प्रभाग क्रमांक ६ मधून करण उदय कराळे आणि प्रभाग क्रमांक ७ मधून पुष्पाताई अनिल बोरूडे , प्रभाग क्रमांक ६ मधून सोनाबाई तायगा शिंदे हे तिघं उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर झालेल्या छाननी व माघारी प्रक्रियेत प्रभाग ६ आणि ७ या दोन्ही प्रभागांमध्ये भाजप उमेदवारां:विरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उरला नाही.त्यामुळे या तिघं प्रभागांमध्ये भाजपने निर्विवाद व ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

प्रभाग क्रमांक ६ मधून विजयी झालेले करण उदय कराळे हे तरुण,अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात.प्रभागातील पाणीपुरवठा,रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता,आरोग्य व नागरी सुविधांसाठी त्यांनी यापूर्वीही सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचेच हे फळ असल्याचे बोलले जात आहे.सोनाबाई तायगा शिंदे ह्या ही बिनविरोध झाले आहे तर प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध विजयी झालेल्या पुष्पाताई अनिल बोरूडे या सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिल्या आहेत.महिला,ज्येष्ठ नागरिक, गरीब व गरजू घटकांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत नागरिकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला.त्यांच्या विजयामुळे महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.या बिनविरोध विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रभागांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी,पेढे वाटप आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.या यशाबाबत प्रतिक्रिया देताना भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा विजय म्हणजे भाजपच्या विकासकामांवर नागरिकांनी टाकलेली शिक्कामोर्तब आहे. अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे.”अहिल्यानगर महानगरपालिकेतील या बिनविरोध विजयामुळे भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणूक लढतींसाठी पक्षाला मोठे मनोबल मिळाले आहे.

No comments