जळगावच्या निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मीरा देशमुख यांनी स्वीकारला पदभार, पोलीस ठाण्यात शिस्तप्रिय महिला अधिकाऱ्याची नियुक्ती !...
जळगावच्या निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मीरा देशमुख यांनी स्वीकारला पदभार, पोलीस ठाण्यात शिस्तप्रिय महिला अधिकाऱ्याची नियुक्ती !
जळगांव जिल्हा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव जिल्हा पोलीस दलात मागील दोन दिवसांपूर्वी पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी नुकतेच काढले होते. यामध्ये निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास शिवराम बोचरे यांचाही कार्यकाळ संपल्याने समावेश होता. त्यांची बदली जळगांव अनैतिक मानवी वाहतूक शाखेत स.पो.नि. योगिता नारखेडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर स.पो.नि. हरिदास बोचरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर नव्याने महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा कल्पेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून. सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी आपला नव्याने निंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार सोमवारी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्याकडून स्वीकारला आहे. यावेळी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी निंभोरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पुढे म्हणाल्या की,मी जिल्ह्यात व या परिसरांत काम केल्याचा निश्चितपणे येथे काम करताना चांगलाच फायदा होईल, तसेच या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रथम न्याय देण्यास व त्यांच्या तक्रारीचे निरसन तसेच गुन्हेगारी नियंत्रणासोबतच कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रथम प्रधान्य आपले असेल असे त्यांनी स्पष्ट आपलं मत व्यक्त केले आहे.यावेळी नूतन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे परिसरांतील सर्वसामान्य नागरिकांकडूनही स्वागत करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे निंभोरा पोलीस ठाण्याला एक शिस्तप्रिय महिला अधिकारी मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून आनंदाचा सूर आहे. यावेळी साताऱ्याहून संभाजी पुरी गोसावी यांनी संपर्कांच्या माध्यमांतून आदरणीय मीरा देशमुख मॅडम जी.ना. शुभेच्छा दिल्या.

No comments