adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रात्रीच्या अंधारात वृद्धावर हल्ला करून लुटमार..जबरी चोरी प्रकरण उघडकीस..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.. रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

  रात्रीच्या अंधारात वृद्धावर हल्ला करून लुटमार..जबरी चोरी प्रकरण उघडकीस..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.. रेकॉर्डवरील गुन्हेगार जेर...

 रात्रीच्या अंधारात वृद्धावर हल्ला करून लुटमार..जबरी चोरी प्रकरण उघडकीस..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.. रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मध्यरात्री वृद्ध व्यक्तीवर धारदार हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा यांनी शिताफीने जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे.या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले असून गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे.या प्रकरणी फिर्यादी श्री. गजाबापु नाथु दांगट (वय ८५,रा. दांगट वस्ती,कात्रड,ता.राहुरी,जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते कुटुंबासह घरात झोपले असताना चार अनोळखी आरोपींनी कशाच्यातरी सहाय्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.आरोपींनी धारदार हत्याराचा धाक दाखवून बळजबरीने सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेत फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण केली.

या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १४३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून तपासाची सूत्रे हलविण्यात आली.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन घेतले व त्यांच्या गुन्हेगारी कौशल्याच्या आधारे शोध सुरू केला.दरम्यान,दि.०१ जानेवारी २०२६ रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुवीर विरुपन भोसले (रा.घासगाव, ता. गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर) याने त्याच्या साथीदारांसह केला असून आरोपी नेवासा फाटा परिसरात आले आहेत.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा फाटा येथे सापळा रचून शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी आपली नावे

रघुवीर विरुपन भोसले (वय १८)

दिनेश विरुपन भोसले (वय २३)

दोघेही रा. घासगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर असल्याचे सांगितले.

सखोल चौकशीत आरोपी रघुवीर भोसले याने सदर गुन्हा त्याच्यासह दिनेश भोसले, तिरंगा कडू उर्फ फादर काळे, बदाम कडू उर्फ फादर काळे, महेश नंदन उर्फ नंदू काळे व आवकाश गोपीनाथ काळे (सर्व रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मिळून केल्याची कबुली दिली.

ताब्यातील आरोपींकडून अधिक चौकशी केली असता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी व शेवगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी व घरफोडीचे एकूण पाच गंभीर गुन्हे त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी रघुवीर भोसले याच्यावर यापूर्वीही अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो काही गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचेही समोर आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४३३/२०२५ अन्वये पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फूरकान शेख, दीपक घाटकर, सोमनाथ झांबरे, भीमराज खरसे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,रमिज राजा अत्तार, अमृत आढाव, विशाल तनपुरे,भगवान थोरात, सागर ससाने, रोहित येमुल,प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे,ज्योती शिंदे, चालक महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे यांनी केली.

No comments