adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखेर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या:- विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा आदेश !

 अखेर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या:- विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा आदेश !   सौ. शुभांगी सरोदे पुरी-गोसा...

 अखेर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या:- विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा आदेश ! 


 सौ. शुभांगी सरोदे पुरी-गोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अनेक दिवसांपासून कोल्हापूर रेंज बदल्यांना प्रतीक्षा लागून होती कोल्हापूर परिक्षेत्रातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्यकाळ पूर्णता: असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश, यामध्ये पुढील प्रमाणे पोलीस निरीक्षकांची नावे कोणाला कोठे पहा... पो.नि.गजानन राजाराम सरगर (कोल्हापूर ते सांगली) पो.नि. अभिजीत सुभाष देशमुख (पुणे ग्रामीण ते सांगली) पो.नि. हेमंत गणपत शेडगे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण) पो.नि. राजेंद्र सदाशिव सावंत्रे (सातारा ते कोल्हापूर) पो.नि. अजित पांडुरंग सिद्ध (सांगली ते कोल्हापूर ) सतीश हिंदुराव शिंदे (सांगली ते कोल्हापूर) पो.नि. स्नेहा कृष्णदेव गिरी (कोल्हापूर ते सांगली) स.पो.नि. धोंडीराम शिवाजी वावळेकर (सातारा ते कोल्हापूर) स.पो.नि. पंकज दिनकर पवार (सांगली ते सातारा ) तर मुदतवाढ पोलीस निरीक्षकांमध्ये पो.नि. अविनाश शिळीमकर ( पुणे ग्रामीण) स.पो‌.नि. मनोजकुमार नवसरे (पुणे ग्रामीण) स.पो.नि. अभिजीत यादव (सातारा) बदल्या झालेल्या संबंधित पोलीस निरीक्षकांनी तत्काळ आपल्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या आदेशात तेथील पदभार कार्यमुक्त करुन नव्याने मिळालेल्या जिल्ह्यात रुजू होण्याचे आदेश देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.

No comments