फैजपुरात आज हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत मर्दानशाह वली बाबांचा संदल; १फेब्रुवारीला कव्वालीचे आयोजन इदू पिंजारी फैजपूर (संपा...
फैजपुरात आज हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत मर्दानशाह वली बाबांचा संदल; १फेब्रुवारीला कव्वालीचे आयोजन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपुर शहरातील हिंदू–मुस्लिम एकतेचे जिवंत प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत मर्दानशाह वली रहेमतुल्लाह बाबा चा पवित्र संदल यात्रा उत्सव यावर्षीही सालाबादप्रमाणे मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त शहरात भक्तीमय आणि आनंदोत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. संदल यात्रेदरम्यान बँड, ढोल-ताशांच्या गजरात मर्दान शाह बाबांना चादर अर्पण करण्यात येते. बँड पथक व ढोल-ताशांच्या जोशपूर्ण जुगलबंदीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. या धार्मिक मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.
31जानेवारी शनिवार रोजी संदल मिरवणूक आणि 1रविवार रोजी दुपारी 4 वाजता आयोजित भव्य कव्वाली कार्यक्रम. परंपरेतील नामवंत कव्वाली राजीक आलम चिशती मुंबई (टीव्ही सिंगर मुंबई), बेबी मुमताज कादरी जबलपूर (टीव्ही सिंगर जबलपूर ) यांचा जंगे मुकाबला सादरीकरणातून होणार आहे भाविकांसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून लंगर (न्याज) चे आयोजन सुरु असते दर्ग्यावर हिंदू, मुस्लिम तसेच इतर सर्व धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने उर्स व संदल सोहळ्यात सामाजिक सलोखा, बंधुता आणि एकात्मतेचे दर्शन घडते.
याच बरोबर उर्स व संदल उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडवी वाडा परिसरात विविध खेळणी, साहित्य व खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जातात. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांसाठी हा उत्सव आनंदाचा ठरतो तसेच स्थानिक व्यावसायिकांनाही यामुळे चालना मिळते. हजरत मर्दानशावली बाबां चा संदल उत्सव हा केवळ धार्मिक परंपरा नसून तो फैजपुर शहराच्या सामाजिक ऐक्याचा, सांस्कृतिक समृद्धीचा आणि आपुलकीच्या परंपरेचा गौरव आहे. शांतता, श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात हा उत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे.

No comments