adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

  यावल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

 यावल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

        कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,यावल येथे प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक ०२ जानेवारी २०२६ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत दत्तक गाव सांगवी येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळा व सार्वजनिक मंगल कार्यालय,सांगवी येथे पार पडले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी श्री.खुशाल पंढरीनाथ चौधरी (हवालदार, तोफखाना – हैदराबाद) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. पुरुषोत्तम वसंत तळले (ग्रामपंचायत अधिकारी, सांगवी) तसेच मा. श्री. अतुल रमेश चौधरी (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगवी) उपस्थित होते.

          उद्घाटक श्री.खुशाल चौधरी यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना शिस्त,राष्ट्रप्रेम व सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

ग्रामपंचायत अधिकारी श्री. वसंत तळले यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांचे विचार, स्वच्छता, गाव विकासातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना स्वावलंबी व ऊर्जाशील होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक श्री.अतुल चौधरी यांनी शिस्त व स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांनी स्वयंशिस्त, समानता,परस्पर सहकार्य व विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण विकसित करण्यावर भर दिला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी व्यक्तिमत्त्व विकास,स्वयंसेवकांचे आचरण,शिस्त आणि सामाजिक जाणीव याबाबत मार्गदर्शन केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.एस.शिरसाठ यांनी केले.

प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.सी.टी.वसावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. पी.व्ही.पावरा यांनी केले.

         या उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.एच.जी.भंगाळे, प्रा.डॉ. भागवत पाटील, प्रा.सुनील पाटील,डॉ.मयूर सोनवणे,डॉ. एस.डी.जाधव,प्रा.मृणाल धायडे, प्रा. पी.व्ही.रावते,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.नागेश जगताप,प्रा. अर्जुन गाढे, प्रा.पी.व्ही.मोरे,श्री. प्रमोद जोहरे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.उद्घाटन कार्यक्रमास एकूण १२५ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

No comments