adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दमदार आवाजाचा आणि रोखठोक बोलणारा महाराष्ट्राचा नेता हरपला ! जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

  दमदार आवाजाचा आणि रोखठोक बोलणारा महाराष्ट्राचा नेता हरपला ! जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली  सौ. शुभागी सरोदे-पुरीगोसावी ( पुणे...

 दमदार आवाजाचा आणि रोखठोक बोलणारा महाराष्ट्राचा नेता हरपला ! जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 


सौ. शुभागी सरोदे-पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळाचा दिवस ठरला आहे. दमदार आवाज आणि रोखठोक बोलणारे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान बारामतीकडे येत असताना विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दादांच्या जाण्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. दादांच्या दुर्दैवी निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली मात्र या बातमीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. बारामतीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारांसाठी ना.अजित दादा पवार यांच्या चार सभांचे आयोजन आज बारामतीत करण्यात आलं होतं त्यासाठी ते मुंबईतून बारामतीकडे विमानाने जात होते. यावेळी बारामतीत विमानतळाच्या धावपट्टीवर लोडिंग करताना हा अपघात झाला आहे. आणि याच विमानात ना.अजित दादा पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शुभांगी पाठक ना.अजित दादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव प्लाइट अरेडंट पिंकी माळी हे कर्मचारी यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. ना.अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार ही मुंबईतून बारामतीला पोहोचले आहेत. ना.अजित दादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. सर्वांच्या प्रश्नावर सडेतर उत्तरे आणि गोरगरिबांचा वाली म्हणून दादांना ओळखले जात होते. दादांचा आवाज म्हणजे सर्वसामान्यांनी गरीब जनतेसाठी महत्त्वाचा मानला जात होता. दादांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रांला मोठा धक्का बसला आहे. आणि आजचा दिवस हा काळाचा ठरला आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जड अंतःकरणाने रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुप कडूंन भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments