दुचाकी चोराला उदगीर ग्रामीण पोलिसांनी केली अटक लातूर. जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायक...
दुचाकी चोराला उदगीर ग्रामीण पोलिसांनी केली अटक
लातूर. जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एका मोटारसायकल चोरास अटक करून ८० हजारांची दुचाकी आरोपींकडून हस्तगत करण्यात आलीय,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नितीन गुरुनाथ मिरजगावे राहणार विकास नगर उदगीर यांची एम एच २४ AR ८३८५ या क्रमांकाची होंडा युनिकाँन कंपनीची दुचाकी चोरीला गेली होती याप्रकरणी १७ डिसेंबर २०२५ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे,पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले या पोलीस पथकातील पोलीस हवालदार राम बनसोडे, पोलीस हवालदार संदीप केंद्रे,पोलीस अंमलदार नामदेव चेवले, पोलीस अंमलदार राजकुमार डबेटवार, पोलीस अंमलदार सचिन नाडागुडे,राजकुमार देवडे,शैलेश सुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी इरफान इस्माईल मणियार वय ३१ वर्ष राहणार नळगीर यांना २६ जानेवारी रोजी बेड्या ठोकल्या व त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे

No comments