adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकशाहीचा सन्मान : स्वामिनारायण गुरुकुलत सावदा–फैजपूर नगरपरिषद प्रतिनिधींचा गौरव

लोकशाहीचा सन्मान : स्वामिनारायण गुरुकुलत सावदा–फैजपूर नगरपरिषद प्रतिनिधींचा गौरव (इदू पिंजारी, फैजपूर) (संपादक :- हेमकांत गायकवाड) नुकत्याच ...

लोकशाहीचा सन्मान : स्वामिनारायण गुरुकुलत सावदा–फैजपूर नगरपरिषद प्रतिनिधींचा गौरव


(इदू पिंजारी, फैजपूर)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये लोकनियुक्त झालेल्या सावदा व फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांचा श्री स्वामिनारायण गुरुकुल, सावदा येथे शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प. पु. स. गु. शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने संपन्न झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प. पु. स. गु. शास्त्री श्री अनंतप्रकाशदासजी, प. पु. स. गु. शास्त्री श्री स्वयंप्रकाशदासजी, कोठारी प. पु. स. गु. शास्त्री श्री विश्वप्रकाशदासजी, प. पु. स. गु. शास्त्री श्री भक्तिप्रियदासजी यांच्यासह पार्षद दीपक भगत प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीपक भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या सत्कार सोहळ्यात फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ यांच्यासह नगरसेविका सौ. जयश्री नरेंद्र चौधरी, सौ. दिपाली जितेंद्र भारंबे, सौ. नीलिमा राजेश महाजन, कुमारी निकिता प्रकाश कोळी, सौ. सुनीता अनंत नेहेते, सौ. अमिता हेमराज चौधरी, सौ. भावना संदीप भारंबे तसेच नगरसेवक श्री सागर हरिश्चंद्र होले, श्री सुरज रमेश गाजरे, श्री महेंद्र अशोक मंडवाले, श्री सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे, श्री विनोद अरुण चौधरी, श्री केतन किरंगे उपस्थित होते.

सावदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांच्यासह नगरसेविका कुमारी सिमरन राजेश वानखेडे, सौ. सुनीता संजय तायडे, सौ. विजया कुशल जावळे, सौ. जयश्री अतुल नेहेते, सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, सौ. रंजना जितेंद्र भारंबे, सौ. सीमा वेडू लोखंडे, सौ. रेखा राजेश वानखेडे तसेच नगरसेवक पठाण तबस्सून धानो फिरोज खान, श्री विशाल प्रेमचंद तायडे, श्री नकुल नितीन बेंडाळे, श्री सचिन चुडामन बऱ्हाटे, श्री श्याम अविनाश अकोले, श्री पंकज राजाराम येवले, श्री हेमंत रूपा महाजन, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांची उपस्थिती होती.

याशिवाय भुसावळ येथील नगरसेविका सौ. प्राची उदय पाटील व यावल येथील नगरसेवक श्री राकेश कोलते यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमास कृषिभूषण श्री नारायण बापू चौधरी (अध्यक्ष, जिल्हा कृषी आघाडी भाजपा व संचालक, सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद), श्री शरद जिवराम महाजन (अध्यक्ष, टी. एम. ई. एस., फैजपूर), श्री नितीन महाजन तसेच यावल व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदू पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री निलेश बोरोले सर यांनी मानले. हा सत्कार सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले.

No comments