adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवाचे आयोजन – विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण प्रारंभ

नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवाचे आयोजन – विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण प्रारंभ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा नगरपरिष...

नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवाचे आयोजन – विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण प्रारंभ



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपरिषद, चोपडा यांच्या वतीने नगराध्यक्षा क्रीडा महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, या क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात यापूर्वी निर्गमित आदेश/परिपत्रकाच्या अनुषंगाने (मागील संदर्भ) सदर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवांतर्गत बॉक्स क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कॅरम, बॅडमिंटन, चेस, रिंगसेव, जलद चालणे (३ कि.मी.) तसेच व्हॉलीबॉल आदी विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सदर स्पर्धा जानेवारी २०२६ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक स्पर्धेसाठी जबाबदार अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

ठरविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक १३ जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. सर्व स्पर्धा पारदर्शक, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. नगराध्यक्षा क्रीडा महोत्सवाचा मुख्य उद्देश नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे व संघभावना निर्माण करणे हा आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चोपडा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments