adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तालसवाडा–शिवनी रोडवर ऑटोचालकाचा मृत्यू; MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

 तालसवाडा–शिवनी रोडवर ऑटोचालकाचा मृत्यू; MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालसवा...

 तालसवाडा–शिवनी रोडवर ऑटोचालकाचा मृत्यू; MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तालसवाडा ते शिवनी रोडवर शेताच्या कडेला एका ऑटोचालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे कायमी मर्ग क्रमांक 01/2026, कलम 194 BNNS 2023 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतकाचे नाव अमोल भावुराव भवरे (वय 35 वर्षे, रा. धरनगाव, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे असून तो व्यवसायाने ऑटो चालक तसेच शेती करत होता. फिर्यादी विजय प्रभाकर भवरे (वय 49 वर्षे, रा. शिवनी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भवरे हा दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान स्वतःचा ऑटो घेऊन शिवनी व भोळी शिवारातील शेत पाहण्यासाठी गेला होता.

दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अजय अनिल गायकवाड (रा. निंबोळी) यांनी पंजाबराव नथ्थु भवरे (रा. शिवनी) यांना फोन करून तालसवाडा ते शिवनी रोडवर राजू रजनिकांत नारखेडे (रा. तालसवाडा) यांच्या शेताच्या कडेला ऑटो जवळ एक व्यक्ती पडलेली असल्याची माहिती दिली.

त्यानंतर फिर्यादीसह नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे अमोल भावुराव भवरे मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे प्रथमदर्शनी समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. MIDC मलकापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. फिर्यादीने मृत्यूबाबत कोणावरही संशय व्यक्त केलेला नसून, कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी HC दिलीप मो. चव्हाण (ब. नं. 936) यांनी नोंद घेतली असून, ASI विजय टेकाडे (पो. स्टे. प्रभारी, MIDC मलकापूर) यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

No comments