यावल महाविद्यालयाचे प्रा. इमरान खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद...
यावल महाविद्यालयाचे प्रा. इमरान खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील उर्दू विभाग प्रमुख प्रा. इमरान खान यांना नुकताच त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. इमरान खान यांची उर्दु ,अरेबिक आणि पर्शियन (हयूमैनिटिज़) विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून निमणुक झाली तसेच महाविद्यालयाच्या नॅक कमिटीवर सदस्य, आविष्कार कमिटी समन्वयक, करियर कट्टा चेअरमन, सरकारी योजना समन्वयक या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत,
प्रा. खान यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत "उर्दु आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये भाषिक देवाणघेवाण" या विषयावर पी एच डी सुरु आहे..
त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे सर्वत्र स्वागत, कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..

No comments