adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्वालियर घटनेचा तीव्र निषेध; ऑल इंडिया पँथर सेनेचे मुक्ताईनगर तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन

 ग्वालियर घटनेचा तीव्र निषेध; ऑल इंडिया पँथर सेनेचे मुक्ताईनगर तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन  मुक्ताईनगर प्रतिनिधी  (संपादक -:- हेमका...

 ग्वालियर घटनेचा तीव्र निषेध; ऑल इंडिया पँथर सेनेचे मुक्ताईनगर तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन 


मुक्ताईनगर प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाळपोळ केल्याची समाजात तीव्र संतापाची लाट उसळविणारी घटना घडली असून, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जातीवादी व समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मुक्ताईनगर येथील तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे देशाच्या संविधानावर आणि राष्ट्रीय एकतेवर घाला घालण्यासारखे आहे. अशा समाजकंटकांवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर ऑल इंडिया पँथर सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा सचिव सागर बावसकर, समाज बांधव चेतन झनके, सोशल मीडिया अध्यक्ष समीर गाढे, बोदवड तालुका अध्यक्ष अतुल धुरंधर, अमर म्हणसाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय भीम | जय पँथर | जय संविधान.

No comments