अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त वाहने लिलावात काढणार दि. 19 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालय चोपडा येथे लिलाव चोपडा तालुक्यात अनधिकृत ...
अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त वाहने लिलावात काढणार
दि. 19 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालय चोपडा येथे लिलाव
चोपडा तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेली विविध वाहने जप्त करून ती ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा येथे लावण्यात आली आहेत. संबंधित वाहन मालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते. मात्र अद्याप दंडात्मक रकमेचा भरणा न झाल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 176 ते 184 नुसार सदर जप्त वाहने जमीन महसुलाची थकबाकी समजून लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने तहसील कार्यालय, चोपडा यांच्याकडील वाहन लिलाव उद्घोषणा जाहीरनामा क्र. गौ.ख/वाहन लिलाव/कावि/47/2026 दि. 09/01/2026 नुसार जप्त वाहनांचा लिलाव दि. 19/01/2026 रोजी तहसील कार्यालय, चोपडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या मार्फत सदर वाहनांचे मूल्यांकन करण्यात आले असून खालीलप्रमाणे वाहने व त्यांची किमान (Upset Price) किंमत निश्चित करण्यात आली आहे.
लिलावासाठी जप्त वाहनांची यादी
वाहन क्रमांक / चेसीस नं.
अ.क्र.
वाहन प्रकार
कंपनी / रंग
किमान किंमत (रु.)
1
विना क्रमांक (फक्त ट्रॉली)
ट्रॉली
निळी
30,000
2
NHN3630025J757924
ट्रॅक्टर व ट्रॉली
न्यू हॉलंड, निळी
5,80,000
3
MBNPFALBEPNG04395
ट्रॅक्टर
महिंद्रा, लाल
3,00,000
4
विना क्रमांक (फक्त ट्रॉली)
ट्रॉली
निळी
50,000
5
MBNBEBBBNPNL12973
ट्रॅक्टर व ट्रॉली
अर्जुन अल्ट्रा, लाल
2,00,000
6
MH 19 CY 4993
डंपर
पिवळा
1,50,000
7
00E156001726
ट्रॅक्टर
स्वराज, निळा
50,000
8
MH 40 A 1963 (PY52035000512)
ट्रॅक्टर
जॉन डियर, हिरवा
50,000
9
QXTN31605043745
ट्रॅक्टर
स्वराज, निळा
25,000
10
99A036700653
ट्रॅक्टर व ट्रॉली
स्वराज, निळा
25,000
11
—
ट्रॅक्टर व ट्रॉली
स्वराज, निळा
30,000
12
—
ट्रॉली
लाल
30,000
तरी सदर लिलाव प्रक्रियेबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व इच्छुकांनी ठरलेल्या दिवशी तहसील कार्यालय, चोपडा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(भाऊसाहेब थोरात)
तहसीलदार, चोपडा
No comments