adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इस्रोच्या अवकाशयात्रेचे महाविद्यालयात दर्शन; सॅटॅलाइट पोस्टर प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद

 इस्रोच्या अवकाशयात्रेचे महाविद्यालयात दर्शन; सॅटॅलाइट पोस्टर प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “सॅ...

 इस्रोच्या अवकाशयात्रेचे महाविद्यालयात दर्शन; सॅटॅलाइट पोस्टर प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

“सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य पोस्टर प्रदर्शनाला विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मार्फत अवकाशात पाठविण्यात आलेल्या विविध सॅटॅलाइट्सची माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली होती.

या पोस्टर प्रदर्शनात आदित्य L-1, चंद्रयान-3, IMS-1, रोहिणी RS-1, जीसॅट-14, XPoSat, मंगळयान (Mars Orbiter Mission), NVS-01 सॅटॅलाइट, Megha-Tropiques Mission, SLV-3, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटेलिजन्स सॅटॅलाइट आदी इस्रोच्या महत्त्वपूर्ण मोहिमांवर आधारित पोस्टर्स सादर करण्यात आले होते. 


या प्रदर्शनाचे उद्घाटन सोयो सिस्टिमचे प्रोप्रायटर श्री. किशोर ढाके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील, तसेच कार्यक्रमाचे आयोजक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. बी. देशमुख उपस्थित होते.

परीक्षक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. दिलीप भारंबे, इलेक्ट्रोसॉफ्ट कंपनीचे श्री. राजेश ठाकरे व श्री. निलेश वाघ यांनी काम पाहिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रोबोट तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.


या पोस्टर प्रदर्शनात एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. अंडरग्रॅज्युएट गटातून रेवेश रामेश्वर खराटे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर निंबेश कमाल बारेला याला द्वितीय क्रमांक मिळाला. त्रिवेणी हेमंत पाटील, मुनिरा एम. शेख, तडवी तनुजा कसम व दिव्या सचिन पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. पोस्टग्रॅज्युएट गटातून बाविस्कर प्रीती जगजीवन हिला प्रथम, तर पाटील जयेश गुलाबराव याला द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हर्षल गंगावणे, प्रा. विशाल तेली, प्रा. पानी सर, श्री. राम पाटील, श्री. राजू सोनवणे व श्री. राजू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


No comments