समाजकार्याची ही प्रेरणा अधिक बळकट करणारा गौरवाचा क्षण ठरला.. पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव तालुका ग्रामीण पत्रका...
समाजकार्याची ही प्रेरणा अधिक बळकट करणारा गौरवाचा क्षण ठरला..
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त नव संकल्प फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारताचे संविधान, शाल व बुके देऊन फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान नव संकल्प फाउंडेशनच्या वतीने वैष्णवी गोलाईत, कोमल तायडे, अमृता तायडे, अभिषेक गोटेकार व बंटी गव्हांदे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी साहेब, नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे मॅडम, बीडीओ राजपूत साहेब व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावडे साहेब यांच्या हस्ते स्वीकारला. या प्रसंगी सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी नव संकल्प फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमास गावातील नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष धन्यवाद सचिन भाऊ बोहरपी व संदीप भाऊ राठोड !

No comments