सनपुले वाचनालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद येथून जवळच असलेल्या सनपुले ता चोपडा येथे संत रोह...
सनपुले वाचनालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद येथून जवळच असलेल्या सनपुले ता चोपडा येथे संत रोहिदास सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय येथे आज सकाळी आठ वाजता दिनदर्शिकेचे प्रकाशन वाचनालयाचे अध्यक्ष अरूण ( नाना ) मोरे व रामेश्वर दुध डेअरीचे चेअरमन प्रल्हाद पाटील माजी पोलीस पाटील हिंमत मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
सुमारे बारा वर्षा पासून सनपुले गावात प्रत्येकाच्या घरात मोफत दिनदर्शिका देण्यात येते हा उपक्रम सनपुले ता चोपडा येथील मूळ रहिवासी व अडावद येथील दै सकाळचे बातमीदार व सार्वजनिक विद्यालयाचे उपशिक्षक रोहिदास मोरे व सनपुले येथील संत रोहिदास सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरुण ( नाना ) मोरे व त्यांचे मोठे बंधू नंदुरबार येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक सुरेश मोरे हे तिघे बंधु करित आहेत
प्रकाशन सोहळ्यात येथील पोलीस पाटील पती ज्ञानेश्वर मोरे माजी सरपंच पती साहेबराव कोळी सुनील मोरे मनोहर मोरे देविदास मोरे शिवाजी पाटील आबा वानखेडे प्रल्हाद मोरे गयभू पाटील पवन निकाळजे चंद्रकांत बाविस्कर भुपेंद्र मोरे रविंद्र निकाळजे गिरीष मोरे कैलास पाटील सोहम मोरे विवेक विसावे राहुल मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमामुळे या तिघे भावांचे सनपुले व चोपडा तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे
सनपुले ता चोपडा येथे वाचनालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना संस्थेचे अध्यक्ष अरूण मोरे प्रल्हाद पाटील हिमंत मोरे ज्ञानेश्वर मोरे साहेबराव कोळी शिवाजी पाटील मनोहर मोरे देविदास मोरे गयभू पाटील सुनील मोरे आदी मान्यवर

No comments