चोपडा तालुक्यात नवीन वर्षानिमित्त रक्तदान शिबिर; आदिवासी समाज कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चो...
चोपडा तालुक्यात नवीन वर्षानिमित्त रक्तदान शिबिर; आदिवासी समाज कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात नवीन वर्षाचे औचित्य साधून आदिवासी समाजातील कार्य बांधवांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात उप सरपंच प्रमोद बारेला, अनिल बारेला ग्रामपंचायत सदस्य, संजय दुदुवे, सागर चोहान, या आदिवासी समाजकार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या उपक्रमात उपसरपंच प्रमोद बारेला यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. त्यांनी आजपर्यंत तब्बल ९ वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. रक्तदानासोबतच प्रमोद बारेला हे आदिवासी समाजातील गरजू नागरिकांना मुंबई, नाशिक, पुणे मोठया शहरात या ठिकाणी उपचारासाठी आवश्यक कागदपत्रे मोफत तयार करून देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.
विशेष म्हणजे मुतखडा पंचवीस रुग्ण, हृदय शस्त्रक्रिया आठ रुग्ण, अपघात चोदा रुग्ण,अशा गंभीर आजारग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या विविध मोफत आरोग्य संबंधित रुग्णालयीन योजनांचा लाभ मिळावा यासाठी ते वैयक्तिक पातळीवर मिळवून दिलेला आहे तसेच यांच्या अनेक दवाखान्यात संबंधित अनेक गरिब रुग्णांना वेळेत उपचार मिळून दिलासा मिळत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये प्रमोद बारेला व नामा पावरा यांनी आरोग्य धुता सारखे गोरगरिबांचे दवाखान्यासंबंधी अहोरात्र सेवा देण्याचे काम त्यामुळे नवीन संकल्प मुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या रक्तदान शिबिरामुळे समाजात सेवाभाव, एकोपा व मानवतेचा संदेश पोहोचला असून प्रमोद बारेला, अनिल पावरा, संजय दुडवे, सागर चोहान या रक्तदात्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.. उपस्थित, उपसरपंच प्रमोद भरेला अनिल पावरा ग्रामपंचायत सदस्य नामा पावरा ग्रामपंचायत सदस्य, संजय बिडवे सागर चव्हाण, विजय पाटील, डॉक्टर राहुल पाटील आदी उपस्थित होते प्रमाणपत्र देण्यात आले

No comments