adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपुरात सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणाऱ्या सातारच्या आरोपींच्या पंढरपूर शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

 पंढरपुरात सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणाऱ्या सातारच्या आरोपींच्या पंढरपूर शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या !   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी...

 पंढरपुरात सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणाऱ्या सातारच्या आरोपींच्या पंढरपूर शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या !  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिसंगी (ता. पंढरपूर) या गावी सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणाऱ्या सातारच्या आरोपींच्या पंढरपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सदर कारवाई ही पंढरपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने उत्कृंष्ट तपास करत तिघांच्या टोळीला अटक करून सोन्याच्या दुकानात व घरफोडी अशा जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिसंगी येथे गावठी सोने दुकानदारांच्या दुकानावर झालेल्या जबरी चोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक १२/११/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ किलो चांदीचे दागिने व सुमारे ९,००,००० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार दाखल होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. प्रीतम यादवकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहिंतीच्या आधारे कारवाई करत आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान दोन ते तीन दिवसांतच आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी देऊर (पोस्ट म्हसवड ता. माण जि. सातारा) येथील असून त्याचे (वय २९) आहे. त्याच्यासह इतर साथीदारांनाही पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे पंढरपूर शहर व परिसरांत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला आळा बसला असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यातच नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या या प्रथम कामगिरीमुळे पंढरपूर शहरांत नक्कीच अवैध धंदे तसेच इतर धंदे कॉलेज कुमार टवाळखोर दहशत माजवणे दादागिरी करणे अशा सर्वांवर पंढरपूर शहर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

No comments