भारतातील पहिल्या महिला स्री शिक्षिका, विद्येची देवता, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले अजीजभाई शेख (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राहाता ...
भारतातील पहिल्या महिला स्री शिक्षिका, विद्येची देवता, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राहाता - वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या दिनांना दैदिप्यमान मार्ग दाखविणारी खरी विद्येची देवता असणारी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटील यांच्या कुळात युग प्रवर्तक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर नवव्या वर्षी च झाला.त्या नंतर 1840 मध्ये त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली.आपल्या संसाराचा त्याग करून सामान्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी चंदनासंम सावित्री झिजली.या देशाचे सर्व अनर्थ एका अविद्येने केले आहे.हे महात्मा फुले यांनी ओळखले. व 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. व 1 जानेवारी 1848 रोजी सावित्री बाई तेथील पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. परंतू त्या काळातील लोकांस हे मान्य नव्हते.म्हणून सावित्री बाई यांचे अंगावर शेण व घाण टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही सावित्री बाई डगमगल्या नाहीत. उलट त्यांनी आपल्या कार्याला जोमाने सुरुवात केली."नींदकाचे घर असावे शेजारी" या उक्ती प्रमाणे आचरण करून त्यांनी न घाबरता आपले हे स्त्री शिक्षणा चे कार्य अधिक बळकटी ने चालू ठेवले. ज्योतिबा यांनी 1 मे 1849 मधे पुण्यातच एके ठिकाणीं प्रौढशिक्षण चालू केले.तेथेही सावित्री बाई यांनी अध्यापन केले. त्या नंतर 1848 मध्येच शिक्षणाची गरज ओळखुन त्यांनी ज्योतिबा यांचे बरोबर जिद्दीने राहून ग्रह त्याग करून सामन्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी शिक्षणाचा मार्ग दाखविला. हे करत असतांना त्यांचे जीवन विष्यमतेच्या चटक्यानी होरपळून निघत असे.. परंतु त्यांनी आपला आत्मविश्वास थोडासाही ढळू दिला नाही. व आपले हे पवित्र ज्ञान दानाचे कार्य हे सतत चालू ठेवले.1852 मध्ये शाळा तपासणी झाली त्या वेळी सावित्री बाईंना आदर्श स्त्री शिक्षिका म्हणून अभिप्राय मिळाला . म्हणूनच 12 जानेवारी 1853 रोजी मेजर क्यांडी यांचे हस्ते विश्रामबागवाडा येथे फुले दाम्पत्याचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या प्रेरणेने फुले दाम्पत्य अधिक जोमाने कामाला लागले. समाज्यातील विषमता हि मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्यांनी कंबर कसली. समाज सुधारणे करिता त्यांनी आपले उभे आयुष्य पणाला लावले.
त्या काळात समाज्यात अनेक वाईट अनिष्ट अश्या रूढी.प्रथा.परंपरा वाढीस लागल्या होत्या. त्या समूळपने नष्ट करण्याचा या फुले दाम्पत्य यांनी चंग बांधला. बालविवाह. सती प्रथा. जातीभेद. कर्मकांड यांना दुजोरा देऊन विधवा पुनर्विवाह चा स्वीकार केला. व समतेची शिकवण देत संपुर्ण आयुष्य पणाला लावून जन कल्याना चा ध्यास घेतला.
त्या काळात बालहत्या मोठ्या प्रमाणात होत असे. म्हणून या निष्पाप निरागस अश्या अर्भकाची हत्या करण्यात येऊ नये म्हणून फुले यांनी आपल्या स्वताच्या राहते घरात 1853 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.या कामी सावित्री बाई यांनी मोलाचे योगदान दिले आहे.या पवित्र कार्याने कित्येक बालकांना जिवदान मिळाले.मात्र या फुले दाम्पत्यास मूलबाळ नव्हते.त्या वेळी सावित्री बाई यांनी ज्योतीबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला असता.ज्योतिबा म्हणाले की 'कदाचित माझ्यात दोष असेल' त्या पेक्षा आपण तुझेच दुसरे लग्न करू.व आपण त्या अपत्यांचा स्वीकार करू. हे वाक्य ऐकून सावित्री बाई निशब्द झाल्या. केवढा हा मनाचा मोठेपणा? त्यानंतर या फुले दांपत्यानी काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण विधवेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले. व त्याला शिकउन डॉक्टर केले.त्या काळात जातीयवाद मोठ्याप्रमाणावर वाढीस लागला होता. अस्पृश्यांना पिण्या करीता लवकर कुणी पाणी ही भरू देत नव्हते. या अस्पृश्य जनतेची दया आली. व फुले दांपत्याने 1868 साली आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला करून दिला. व एक प्रकारे समतेची क्रांती घडवून आणली. व अस्पृश्य जनतेची सेवा केली.या वेळीं त्यांना अनेकदा वारंवार गंभीर अश्या अनेक अडचनिसी सामना करावा लागला. तरी देखील त्यांनी आपले हे पवित्र ज्ञान दानाचे कार्य न सोडता अधिक जोमाने सुरू केले. त्या काळात अंधश्रधा मोठ्यप्रमाणावर वाढीस लागली होती.. संपुर्ण समाज हा अंधश्रध्देच्या खाईत गाडला गेला होता. आणि जो पर्यंत हा समाज अंधश्रध्देच्या बाहेर येत नाही तो पर्यंत समाज्या ची प्रगती होणार नाही हे मर्म फुले दांपत्य यांनी ओळखले व त्या अनुषंगाने त्यांनी हे आपले समाज सुधारण्याचे कार्य अती जोमाने सुरू केले. अंधश्रध्देचा पगडा समाज्यावर होता. मूलबाळ होण्या करिता देवाला नवस करण्याची प्रथा होती. सावित्रीबाईच्या मते-, देवाला नवस करून जर मुल होत असतील तर महिलांना पुरुषांशी लग्न करण्याची काय गरज आहे.असे परखड विचार सावित्री बाई फुले यांनी मांडले. व समाजाला अंधश्रध्देच्या जोखडातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केले. फुले दांपत्य है एक कठोर असे समाज समाज सुधारक होते. जेव्हा पुणे आणि परिसरात 1875ते 1877दरम्यान सतत दुष्काळ पडला होता.अनेक मुले अन्नावाचून तडफडून मरत होती. तेव्हां फुले दाम्पत्य यांनी 52 अन्नछत्र उघडुन आंधळे पांगळे यांची भूक भागविली. सावित्री बाई स्वतः भाकरी करून खाऊ घालत असे.रोज दोन हजाराच्या आसपास भाकरी केल्या जात असे.या कामी त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. सावित्री बाई या समंतेच्या ऊर्जा स्रोत म्हणून काम करतांना कोणतेही काम त्यांनी अगदी मनापासून केले. या बाबत सावित्री बाई कधीही थकल्या नाहीत. सावित्री बाईनी कधीही सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मोह धरला नाही. काळ्या मण्याची पोत व एक मंगळसूत्र एवढेच त्यांचे सौभाग्याचे लेणे होते. जोतिबा घरी नसतानाहिं त्यांनी अनेक गरजू लोकांचे प्रश्न सोडविले.. समाज एकत्र येऊन समतेचा विचार रुजला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. पुढे ज्योतिबा पक्ष घाताने आजारी पडले त्या वेळी माञ सावित्री बाई खचल्या. आजार पणात त्यांनी ज्योतिबा ची सतत सेवा केली. परंतू ज्योतिबा यातून सावरू शकले नाही. सेवट पर्यंत त्या आपल्या या समाज कार्य करण्या पासून तसू भरही विचलित झाल्या नाहीत. सावित्री बाई फुले यांनी समाजाच्या हिता करिता आपली काया झीजवली. अशिक्षित जनतेला शिक्षणाचा पाया करून दिला. आणि त्या काळात संपुर्ण समाज्या ला समतेची शिकवण देणारी एकमेव स्री म्हणून सावित्री बाई फुले यांच्या नावाचा उल्लेख आढळतो.
सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना नम्र आवाहन करतो.की विशेष तहा तरुण पिढी ने जीवघेण्या व्यसनापासून अलिप्त राहून या अनमोल शरीराचे आरोग्य धोक्यात येईल असे वागू नका. खूप शिका मोठे व्हा. आई वडिलांची सेवा करा. शिक्षण घेऊन देश सेवा करा. आणि एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या प्रमाणे समाजात आपले सतत आचरण ठेवा.. थोडक्यात <जे का रंजले गांजले. तयांशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. या उक्ती प्रमाणे आचरण केले तर निश्चित च आपल्या देशाची अधिकाधिक प्रमाणात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.
शब्दांकन =
श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर. [ एम ए.बी एड]
(सेवा निवृत शिक्षक रयत शिक्षण संस्था,).
साकुरी. ता.राहता.जिल्हा.अहिल्या नगर
मो.9604797316

No comments