जे टी महाजन तंत्रनिकेतन मध्ये वार्षिक स्नेह संमेलन – सृजन २०२६ उत्साहात संपन्न इदू पिंजारी फैजपूर- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे. टी. ...
जे टी महाजन तंत्रनिकेतन मध्ये वार्षिक स्नेह संमेलन – सृजन २०२६ उत्साहात संपन्न
इदू पिंजारी फैजपूर-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. टी. महाजन तंत्रनिकेतन, फैजपूर येथे आयोजित वार्षिक स्नेह संमेलन ‘सृजन २०२६’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाला संस्थेच्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव शशिकांत चौधरी, नारायण झांबरे तसेच पी. के. फालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन स्नेह संमेलन समन्वयक एच. आर. कोलते यांनी केले.कार्यक्रमात नृत्य, गायन, नाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे परीक्षण ए. एस. कोळी व हिमानी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी धनश्री इंगळे, वैभवी बढे, ओम महाजन व आदिनाथ वाघ यांनी यशस्वीपणे सांभाळली. सूत्रसंचालनासाठी रूपाली मॅडम व सिद्धी बोरोले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी. एम. राणे यांनी सांगितले की, “आजचा हा दिवस आपल्या संस्था जीवनातील एक अविस्मरणीय दिवस आहे. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले कला कौशल्य प्रभावीपणे सादर केले आहे. त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता व सामूहिक भावनेचे महत्त्व समजले असून मी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देतो असे प्रतिपादन केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सृजन २०२६ मुळे विद्यार्थ्यांच्या कला, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

No comments