निवडणुकीची चुरस रक्तरंजित! सुयोग पार्कमध्ये भाजप युती उमेदवाराच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१४):- शहरातील सुयोग पार्क,आदर्श नगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तुफान हाणामारीत एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणात भाजप युतीचे उमेदवार दत्ता सोमनाथ गाडळकर यांच्या कुटुंबावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून,या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.प्रभाग क्रमांक १५ मध्ये सध्या महापालिका निवडणूक चांगलीच चुरशीची झाली असून, त्यातूनच हा हिंसाचार घडल्याची चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार,या हल्ल्यात सिद्धांत देवकर याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments