adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- स.पो.नि. वर्षा व्हगाडे-शिंदे यांचा संदेश!

 हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- स.पो.नि. वर्षा व्हगाडे-शिंदे यांचा संदेश!   संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा ) प्...

 हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- स.पो.नि. वर्षा व्हगाडे-शिंदे यांचा संदेश! 


 संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सध्या नुकतेच नवीन वर्षाला सुरुवात झाली असून आणि याच वर्षाची सुरुवाती ही मकर संक्रांत या सणापासून होत असतं. आणि याच पार्श्वभूमीवर मकर संक्रातीच्या नंतर अनेक ठिकाणी महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जातं किंवा प्रत्येक महिलांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा भरवला जातो. आपण जर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जात असाल तर महिलांनी मौल्यवान दागिन्यांची काळजी नक्कीच घेतली पाहिजे असे आवाहन बीड जिल्हा प्रशासन आणि वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे-शिंदे यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाला जाताना महिलांनी एकटे जाऊ नये सलग ग्रुपने जावे. तसेच आम्ही पोलिस आहोत पुढे तपासणी चालू आहे. आपले दागिने काढून ठेवा, किंवा मोटरसायकल वरून येणारे चोरटे अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्या तर तत्काळ आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याची संपर्क साधावा. बीड जिल्हा पोलीस प्रशासन महिलांच्या कायम पाठीशी आहे. महिलांना कोणती अडचण भासल्यास किंवा तत्काळ मदतीसाठी डायल 112 किंवा 02442-222333 या क्रमांकावर संपर्क साधावा... असेही आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे-शिंदे यांनी केले आहे.

No comments