क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध प्रदर्शनीचे आयोजन / कामगार मंत्री नामदार श्री.आकाशदादा फुंडकर...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध प्रदर्शनीचे आयोजन / कामगार मंत्री नामदार श्री.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव - प्रदर्शनीचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपरिषद खामगाव क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका येथे सकाळी ११ वाजता भव्य प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना. अँड आकाशदादा फुंडकर (कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य) हे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी नगराध्यक्षा मा. सौ. अपर्णाताई सागर फुंडकर राहणार आहेत.
सदर प्रदर्शनी मध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनी ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू, नाणी संग्रह, शिवकालीन शिवराई, सावित्रीबाई फुले जीवन प्रवास रेखाचित्र तसेच भारतीय दुर्मिळ पक्षाची छायाचित्रे इतक्या दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी उपलब्ध होत आहे. तरी या अविस्मरणीय संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरपरिषद खामगावचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी केले आहे.

No comments