adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला..स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

 थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला..स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-शासकी...

 थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला..स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील इराणी गल्ली परिसरात बुधवारी दुपारी घडली.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने स्वसंरक्षणासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याघटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड क्र. 1, श्रीरामपूर)याचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे गुन्हे तपास पथक श्रीरामपुरात आले होते. दुपारी सुमारे 2 वाजता शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने खासगी वाहनातून इराणी गल्ली परिसर गाठला.आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह पथक घरात प्रवेश करताच कुटुंबीयांनी झडतीस विरोध केला. पोलिस आल्याचे लक्षात येताच आरोपी मागील दरवाजातून पळून गेला. पाठलाग करताना पोलीस कर्मचारी किरण मदने यांनी कंपाउंडवरून उडी घेत आरोपीला पकडले. मात्र आरोपीने जोरदार प्रतिकार केला.याचवेळी परिसरातील 30 ते 40 जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. आरोपीने जमावाला पोलिसांविरुद्ध दगडफेक करण्यासाठी भडकावल्याचा आरोप आहे. जमावातील 5 ते 7 अनोळखी इसमांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून खेचून सोडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती अधिक चिघळत असताना आरोपीने ‘झेरु’ नावाच्या तरुणास थेट हल्ल्यास प्रवृत्त केले.यानंतर 18 ते 19 वर्षे वयोगटातील एका तरुणाने हातात लोखंडी कोयता घेऊन पोलिसांवर धाव घेतली. त्याने पोलीस कर्मचारी किरण मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना हा वार त्यांच्या उजव्या मनगटावर बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.पोलिस पथकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत एक गोळी झाडली. गोळीबारानंतर जमाव गल्लीबोळातून पळून गेला. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे हवालदार अजय सरजिने यांच्या फिर्यादीवरून आयद बाबुलाल सय्यद, झेरु (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) तसेच जमावातील महिलांसह 5 ते 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

No comments