adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांचा दणका..! सराईत गुंड ६ महिन्यांसाठी तडीपार

  कोतवाली पोलिसांचा दणका..! सराईत गुंड ६ महिन्यांसाठी तडीपार सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :-नगर शहरातील काय...

 कोतवाली पोलिसांचा दणका..! सराईत गुंड ६ महिन्यांसाठी तडीपार


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुंडावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुंड फेजान फिरोज शेख उर्फ दसकिलो (वय ३०,रा.राज मेडिकलजवळ,रामचंद्र खुंट) यास तब्बल सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे.

फेजान शेख याच्यावर नागरिकांना हाणामार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, हत्या करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करणे,दंगा करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक चौकशी व सुनावणीनंतर संबंधित प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी फेजान शेख यास ताब्यात घेऊन दि.१० जानेवारी रोजी तडीपारीची कारवाई अंमलात आणली. या निर्णयामुळे शहरातील गुन्हेगारी वातावरणावर नियंत्रण येण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,पोलीस अंमलदार संतोष बनकर,दौंड,वसीम पठाण,शाबीर शेख,विशाल दळवी,विनोद बोरगे, अविनाश वाकचौरे,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अभय कदम,अमोल गाडे,सचिन लोळगे, सुरज कदम,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महिला पोलीस अंमलदार दरंदले,कांबळे,अतुल काजळे,याकूब सय्यद,राम हंडाळ,अतुल लाटे, सोमा केकाण,दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस राहुल गुंडू यांनी केली आहे.

या कठोर कारवाईमुळे नगर शहरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, भविष्यातही अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

No comments