adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युनिक शाळेत चिमुकल्यांचा देशभक्तीचा जल्लोष; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

युनिक शाळेत चिमुकल्यांचा देशभक्तीचा जल्लोष; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा   सतीश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) युनिक शाळे...

युनिक शाळेत चिमुकल्यांचा देशभक्तीचा जल्लोष; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 


 सतीश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

युनिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह अनुभवला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालकांमधूनच लकी ड्रॉ पद्धतीने प्रमुख पाहुण्याची निवड करून ध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला.
लकी ड्रॉमध्ये छोटे केळी वेफर्स व्यावसायिक श्री. शरद मन्साराम पाटील (मेळसांगवे) यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड झाली. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी भाषण, देशभक्तीपर गीतगायन व विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. प्रतीक्षा चौधरी यांनी केले. 

प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे तसेच संस्थापक अध्यक्ष श्री. आत्माराम मासुळे सर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर भाषणातून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments