चोपडा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक भैय्यासाहेब पंकज बोरोले यांची धडाकेबाज सुरुवात चोपडा प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...
चोपडा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक भैय्यासाहेब पंकज बोरोले यांची धडाकेबाज सुरुवात
चोपडा प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तर्फे वॉर्ड क्रमांक १५ मधून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नगरसेवक भैय्यासाहेब पंकज बोरोले,वंदनाताई पाटील व वैशालीताई पवार यांनी पदभार स्वीकारताच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या कामाची प्रभावी सुरुवात केली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर परिस पार्क कॉलनीतील एका समस्येबाबत शेखरभाऊ शिरसाठ यांनी नगरसेवक पंकज बोरोले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कॉलनीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शहरात सुरू असलेल्या अंडरग्राऊंड गटारीच्या कामानंतर नागरिक अनेक दिवसांपासून काँक्रिट रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र रस्त्याच्या कामाआधी आवश्यक असलेल्या नळ कनेक्शनमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ही गटाराच्या पाइपच्या खाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नुकत्याच इंदूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर असल्याचे ओळखून नगरसेवक पंकज बोरोले यांनी तत्काळ संबंधित पाइपलाइनचे फोटो घेतले व नगरपालिका कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. कार्यालयीन वेळ संपली असतानाही कर्मचाऱ्यांनी थांबून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नवीन व सुरक्षित पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली.
या कामाचे उद्घाटन करताना नगरसेवक पंकज बोरोले यांनी सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत तसेच कुठेही दिरंगाई होऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या तत्परतेमुळे व कामाच्या पद्धतीमुळे कॉलनीवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून तरुण, तडफदार नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कॉलनीवासीयांच्या वतीने नगरसेवक भैय्यासाहेब पंकज बोरोले व सुमित पाटील यांचा शेखरभाऊ शिरसाठ यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नंदकिशोर सांगोरे, मुन्नादादा साळुंखे, अनिलभाऊ सोनवणे, विजयकुमार देसले, गोपाल सोनवणे, मच्छिंद्र कोळी, चंद्रकांत बाविस्कर सर, किशोर पाटील, उदय बोरसे, दीपक चौधरी, जितेंद्र महाजन सर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments