डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणाऱ्या दिलीप नेवे ची चौकशी करून सजा द्या. केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसेंना निवेदन. चोपडा प्रतिनिधी (स...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणाऱ्या दिलीप नेवे ची चौकशी करून सजा द्या.
केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसेंना निवेदन.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:--भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद व बदनामी कारक मजकूर व्हायरल करणाऱ्या दिलीप लक्ष्मण नेवे विरुद्ध शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या व बौद्ध समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला असून शहरातील व तालुक्यातील सर्वच समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला गेला.
सविस्तर वृत्त असे की दिलीप लक्ष्मण नेवे याने दोन डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेला फेसबुकवर पुष्पराज त्रिपाठी याची पोस्ट शेअर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बदनामी कारक तथ्यहीन पोस्ट प्रसारित केली.त्यामुळे सर्वच जातीधर्माच्या व बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्याने शहरातील शेकडो बौद्ध धर्माच्या तरुणांनी महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवीला.त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द गुन्हा क्र1/2026,बी एन एस कलम नुसार196(1)अ,353/(2)356(2),356(3)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील जनतेचा उद्रेक झाल्यावर काही महिलांनी दिलीप नेवे याला चोप दिल्याची चर्चा,बातमी सर्वत्र जोर धरत आहे.आणि अनेकांनी या वाईट प्रवृत्तीचा निषेध केला असून भविष्यात अशी चूक कोणी करणार नाही यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवेदन दिले असून मंत्री महोदयांनी ही अश्या वाईट प्रवृत्तीचा निषेध करत न्याय देण्याचं आश्वासन दिले असून या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते समाधान सपकाळे, अनिता बाविस्कर,ललिता बाविस्कर,निलेश सपकाळे,आदर्श विलास भालेराव,आनंद वाघ,चेतन सोनवणे यांच्या स्वाक्षरी आहेत.

No comments