adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोलते परिवाराचा स्नेहमेळावा उत्साहात; आमदार अमोल जावळेंची उपस्थिती

 कोलते परिवाराचा स्नेहमेळावा उत्साहात; आमदार अमोल जावळेंची उपस्थिती भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) माजी नगराध्यक...

 कोलते परिवाराचा स्नेहमेळावा उत्साहात; आमदार अमोल जावळेंची उपस्थिती


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राकेश कोलते यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा स्नेहमेळावा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावून पारंपरिक भरीतपुरी–कोशिंबिरीचा आस्वाद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमास यावल तालुका व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये 


शरदभाऊ महाजन, हिरालाल चौधरी,  प्रभाकर आप्पा सोनवणे, प्रमोद नेमाडे, नारायण बापू चौधरी, भरत पाटील, सागर कोळी, ज्ञानेश्वर तायडे, जिभाऊ, हर्षल पाटील, उमेश फेगडे, बाळू फेगडे, दीपक अण्णा, विलास चौधरी, नरेंद्र नारखेडे, राकेश फेगडे, गटनेता नंदाताई महाजन, सविता नन्नवरे, शुभांगी येवले, कल्पना वाणी, सविताताई भालेराव, अतुल भालेराव, प्रदीप फालक, अभय देवरे, भूषण फेगडे, मुकेश कोळी, संदीप सोनवणे, रमेश नेमाडे, राजेंद्र महाजन, विजय नन्नवरे, रोशन येवले, मुकेश येवले, संजय कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सदर कार्यक्रमाची सुरुवात कै. सुभाष गंगाधर फालक यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी केली होती. ही सामाजिक एकोप्याची परंपरा राकेश कोलते यांनी आजतागायत जपली असून शहरातील सर्व मित्रपरिवारांना सोबत घेऊन हा स्नेहमेळावा दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

या मेळाव्यात महिला गट, पुरुष गट तसेच लहान मुला–मुलींसाठी स्वतंत्र गट तयार करून संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना तिथेच आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, हास्य, उत्साह आणि स्नेहाचे वातावरण पाहायला मिळाले.

No comments