वडती येथील कुमार राधेशाम अशोक कंडारे यांना ‘काव्यरत्न पुरस्कार’ जाहीर चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) वडती : वडती येथील युवा कवी...
वडती येथील कुमार राधेशाम अशोक कंडारे यांना ‘काव्यरत्न पुरस्कार’ जाहीर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
वडती : वडती येथील युवा कवी कुमार राधेशाम अशोक कंडारे यांना ‘काव्यरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याने साहित्यप्रेमींत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कीर्तनकार व कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर (आळंदीकर) यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते असून संमेलनाचे संयोजक म्हणून श्री. शिवराज पाटील काम पाहत आहेत. विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील एकूण ५१ कवींची निवड करण्यात आली असून त्यांना गौरवपदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनात कवी-लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय “मराठी साहित्याने मला काय दिले?” असा आहे. तसेच समारोप सत्रात “कविमनाची आरोळी… विश्वात्मक चारोळी” या विषयावर उत्स्फूर्त चारोळी सादरीकरण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
कुमार कंडारे यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वडती गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, पुज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती येथील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments