स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून डॉ. अमोल फिरके यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर अमोल बावस्कार बुलढाणा (संपाद...
स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून डॉ. अमोल फिरके यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुर:- आरोग्यदीप हाॅस्पिटल चे संचालक डॉ. अमोल फिरके यांच्या आरोग्यदीप हॉस्पिटलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्य सचिव कलीम शेख यांच्या पुढाकाराने आज दि.11 जानेवारी 26 रविवार रोजी शहरातील अपंग, गोरगरीब, रुग्णांची आरोग्य तपासणी,सीबीसी,बि.पी, हिमोग्लोबिन, शुगर,ईसीजी आदिंची मोफत वैद्यकीय तपासणी व या रुग्णांना आजीवन आयुष्यभर मोफत उपचार केले जाणार असल्याचे डॉ.अमोल फिरके यांनी सांगितले.
रविवार रोजी आयोजित या शिबिरात अपंग जनता दल स़घटनेचे राज्य सचिव शेख कलीम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी,हिदायत जमादार, संदीप भोंबे,सोनु जवळकार, सत्तार शाह, गणेश पोलाखरे,यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात शुभांगी एकनाथ डवले, विजय रमेश भोंबे, शेख एजाज, अजय सोनाजी कासे, शेख आसिफ, शेख एजाज शेख अयुब,सै.आसिफ,संध्या प्रभाकर पहाडे, सिंदू जवळकार, शेख वसीम,अर्जुन चोपडे, उमेश टाकसाळे,मो.रफिकभाई, शेख सलीम,मो.सोफीयान,मो.अयानसह आदी अपंग व दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली या सर्व दिव्यांग बांधवांना डॉ.अमोल फिरके यांचे तर्फे मोफत औषधी देण्यात आली. यावेळी डॉ अमोल फिरके यांची टीम राहुल बोरसे, यश भोळे ,जीवन इंगळे ,संगीता मालठाणे,ओम काॅम्पयुटराईज क्लिनिक लेबाॅटरीरचे संचालक संदीप लंबोधरी यांची उपस्थिती होती.

No comments