adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पदवीधर शिक्षिका सौ. अलकनंदा रमेश परिहार यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुंदर व कलात्मक अशी रांगोळी रेखाटली

पदवीधर शिक्षिका सौ. अलकनंदा रमेश परिहार यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुंदर व कलात्मक अशी रांगोळी रेखाटली  अमोल बावस्कार बुल...

पदवीधर शिक्षिका सौ. अलकनंदा रमेश परिहार यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुंदर व कलात्मक अशी रांगोळी रेखाटली 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, वरखेड,  येथील पदवीधर शिक्षिका सौ. अलकनंदा रमेश परिहार यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या राहत्या घरी अत्यंत सुंदर व कलात्मक अशी रांगोळी रेखाटली.

या रांगोळीतून राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्व, संस्कार व राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले आहे. रांगोळीतील रंगसंगती, प्रतीकात्मक रचना आणि बारकावे पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, इतिहासप्रेमी व नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

शिक्षणासोबतच सांस्कृतिक जतन व सामाजिक प्रबोधनाची भूमिका जपणाऱ्या सौ. अलकनंदा परिहार यांच्या या कलात्मक उपक्रमामुळे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव अधिक अर्थपूर्ण ठरला आहे. अशा उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत इतिहास व संस्कार पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

No comments