adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा तालुका व शहरातील अवैध मटका जोमात, युवा पिढी कोमात असल्या बाबतचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक यांना निवेदन सादर

निलंगा तालुका व शहरातील अवैध मटका जोमात, युवा पिढी कोमात असल्या बाबतचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक यांना निवेदन सादर   लातूर जिल्हा प्रतिनिधी (स...

निलंगा तालुका व शहरातील अवैध मटका जोमात, युवा पिढी कोमात असल्या बाबतचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक यांना निवेदन सादर  


लातूर जिल्हा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

निलंगा तालुका व शहरातील अवैध मटका जोमात, युवा पिढी कोमात असल्या बाबतचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक यांना निवेदन सादर अशा आशयाचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निलंगा तालुका व शहरातील अवैध मटका मोठ्या प्रयमाणात चालू आहे. त्यामुळे गोरगरिब कुटूंबाच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. सामाजिक व्यवस्था बिघडत चालली आहे. तसेच सदरील मटक्यामधील दिवसरात्र शिवाजी नगर, हडगा नाका, दत्त नगर, दापका वेस, जुने तहसील कार्यालयाच्या बाजूस, बाबार मार्केटच्या बाजूला, लांबोटकर पेट्रोल पंपाच्या बाजूला, दुध डेअरीच्या बाजूस व इतर ठिकाणी संपूर्ण निलंगा तालुका व शहर अंबुलगा (बु.) बोरसुरी, हलसी (तु.) राठोडा, कोकळगाव, मुदगड (ए), केळगाव, काटेजवळगा, लांबोटा येथे सरासपणे चालू आहे. त्यामुळे निलंगा शहरातील व तालुक्यातील व शाळेतील मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे व पुढे चालून विद्यार्थीही या मार्गावर वळतील व शिक्षणा ऐवजी मटका खेळत फिरतील, मटक्यामुळे तरुण पिढी आपल्या घरातील एक एक भाडे विकून मटका खेळत आहेत. यामुळे त्यांच्या जीवनाची राखरांगोळी होत आहे. मटका सुध्दा छोट्या गल्ली पासून ते मोठचा रस्त्यापर्यंत मा. पोलीस कर्मचा-यांच्या आशिर्वादाने पावला-पावलाने घेतला जात आहे. म्हणून प्रशासन त्यांच्याकडे जाणुनबुजून डोळे झाक करीत आहेत तरी मा. साहेबांनी संपूर्ण निलंगा शहरातील व तालुक्यातील मटका तात्काळ बंद करून मटका घेणा-यावर कलम 188 व 328 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अन्यथा निम आर्मी संघटने तर्फे मा. उपविभागीय कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे 

No comments