यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील व्यास श...
यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यास शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी मा. ए. बी. महाजन सर उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम, इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम, ITI चे प्राचार्य श्री. जी. जी. वाघुळदे सर, तसेच ITI चे शिक्षक मा. प्रवीण झोपे सर, मा. अशोक चौधरी सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायन करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” अशा घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ए. बी. महाजन सर यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी शिक्षिका मनीषा पाटील मॅडम व प्रीती भार्गव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या म्युझिकल कवायतीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेश्मा पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धा बडगुजर मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

No comments