भालकी तालुक्यातील सीमेवरील हालसी तुगावसाठी मंत्री श्री ईश्वर खंड्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लातूर जि.प्र. (उत्तम माने) (संपादक -...
भालकी तालुक्यातील सीमेवरील हालसी तुगावसाठी मंत्री श्री ईश्वर खंड्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान
लातूर जि.प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा व भालकी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हालसी तुगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वन, पर्यावरण व जैवविविधता मंत्री श्री ईश्वर खंड्रे यांनी मोलाचे सहकार्य दिले आहे. गावातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जत्रा (कायर) महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामस्थांच्या गरजांना प्रतिसाद देत ₹2 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या निधीतून हालसी तुगाव गावात हाती घेण्यात आलेली सर्व विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये गावातील प्रमुख रस्त्यांची सीसी रोड बांधकामे, सुसज्ज नाले/ड्रेनेज व्यवस्था, ग्रामस्थांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्णत्वास नेण्यात आली आहे. या कामांमुळे जत्रा महोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांसह रोजच्या जीवनातही ग्रामस्थांना मोठा लाभ होत आहे. सीमाभागातील गावांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या मंत्र्यांच्या दूरदृष्टीचे हे उत्तम उदाहरण असून, आज हालसी तुगाव एक आदर्श विकसित गाव म्हणून उभे राहिले आहे. या सर्व विकासकामांसाठी मंत्री श्री ईश्वर खंड्रे यांचे हालसी तुगावच्या सर्व ग्रामस्थांकडून मनःपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

No comments