चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिना...
चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक :-१२/०१/२०२६ रोजी श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग &पॉलीटेक्निक),चोपडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.बोरसे यांनी असे विधान केले की,राजमाता जिजाऊ यांनी केवळ एका महान योद्ध्याला जन्म दिला नाही तर आदर्श संस्कार,राष्ट्रभक्ती,स्वराज्याची प्रेरणा व चारित्र्याचे बळ छत्रपती शिवाजी महाराजांना दिले.तसेच स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना आत्मविश्वास,ध्येयवाद व सेवाभावाची शिकवण देत संपूर्ण जगाला भारताच्या अध्यात्मिक शक्तीची ओळख करून दिली.आजच्या युगात विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन तंत्रज्ञानासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षण आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे.या कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एस.सोनवणे,सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments