adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गीता मुखपाठात महिलांची उज्ज्वल कामगिरी; फैजपूरात परीक्षाउत्तीर्ण भगिनींचा भव्य सत्कार

गीता मुखपाठात महिलांची उज्ज्वल कामगिरी; फैजपूरात परीक्षाउत्तीर्ण भगिनींचा भव्य सत्कार  इदू पिंजारी, फैजपूर (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर...

गीता मुखपाठात महिलांची उज्ज्वल कामगिरी; फैजपूरात परीक्षाउत्तीर्ण भगिनींचा भव्य सत्कार 


इदू पिंजारी, फैजपूर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीच्या वतीने सामूहिक तुळशी अर्चन, विठ्ठल नामजप व संगीत रामायण कथा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी श्रीमद् भगवद्गीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांचे मुखपाठ परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या महिलांचा तुळशी अर्चन महोत्सवात भव्य सत्कार करण्यात आला. यामध्ये सुहासिनी गंगाधर चौधरी (फैजपूर), सौ. रुपाली रवींद्र भारंबे (न्हावी), सौ. कुंदा लक्ष्मण पाटील (भुसावळ), सौ. ज्योत्स्ना त्रंबक इंगळे (न्हावी) यांचा विशेष समावेश होता. या परीक्षाउत्तीर्ण महिलांचा श्री संत माणकोजी महाराज बोधले परंपरेचे ऍड. जयवंत महाराज बोधले, कन्हैया महाराज राजपूत, रवींद्र महाराज हरणे, दुर्गादास महाराज नेहते, पंढरीनाथ आरू महाराज, प्रविणदास महाराज भावसार, नरेंद्र नारखेडे व निळकंठ सराफ यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र व ११ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारप्रसंगी उपस्थित भाविक व समिती सदस्यांनी सांगितले की, या उपक्रमातून माता-भगिनींच्या धार्मिक व बौद्धिक योगदानाचा गौरव होत असून समाजात सकारात्मक संदेश जात आहे. सत्कार स्वीकारताना महिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, भगवद्गीता कर्म, भक्ती व ज्ञान यांचा संगम शिकवून जीवन कर्तृत्ववान व दिशादर्शक बनवते. यावेळी कीर्तनकार जयवंत महाराज बोधले यांनीही गीतेचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

No comments