सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्ताने आईची पुस्तक तुला यावल येथे कवडीवाले कुटुंबाने केला स्तुत्य उपक्रम भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत ...
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्ताने आईची पुस्तक तुला
यावल येथे कवडीवाले कुटुंबाने केला स्तुत्य उपक्रम
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
: आजच्या तंत्रज्ञान युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना यावल येथे कवडीवाले वाड्यात श्रीमती रमाबाई रघुनाथ कवडीवाले यांच्या ८१ वर्षपूर्तीनिमित्त सहस्रचंद्र दर्शन सोहळा कार्यक्रमात त्यांची पुस्तक तुला करून, वाचन संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे कवडीवाले वाड्यात श्रीमती रमाबाई कवडीवाले यांच्या ८१ वर्षपूर्तीनिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा कार्यक्रम नुकताच (ता. २३) झाला. यावेळी श्रीमती कवडीवाले यांची तुला धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासीक, चरित्र, प्रवासवर्णन, बालसाहित्य मराठीसह इंग्रजी पुस्तकांची करण्यात आली. यावेळी सुमारे दीडशे पुस्तके ठेवण्यात आली होती.
त्यानंतर मोतीचूर लाडू तुलाही करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर तुला झालेली सर्व पुस्तके उपस्थित पाहुण्यांना मोफत वितरीत करण्यात आली. पुस्तक तुला करतांना श्रीमती रमाबाई कवडीवाले यांचा पणतु गौरांग यावलकर याचे हस्ते सर्वप्रथम पुस्तक ठेवून व त्यानंतर उपस्थित सर्व कुटुंबिय, नातेवाईक, पाहुणे मंडळी यांच्या हस्ते पुस्तक ठेऊन पुस्तक तुला करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती रमाबाई कवडीवाले यांच्या नातवंडांनी उपस्थितांचे स्वागत गित व नृत्याद्वारे केले. यावेळी श्रीमती रमाबाई कवडीवाले यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्यांचे मनोगत पेंडॉलमध्ये जागोजागी लावण्यात आले होते, शिवाय जुन्या आठवणींना उजाळा म्हणून काही जुने फोटोही लावण्यात आले होते.
या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार राजू कवडीवाले यांचा मुलगा आकाश कवडीवाले याची थायलंड स्थित युनिलॅम्प लायटींग कंपनीच्या भारतासह, मालदीव, पाकीस्तान, बांगलादेश, अफगणिस्तान, भूतान, श्रीलंका,नेपाळ, या आठ देशांच्या सार्क देशासाठी प्रादेशीक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्याचा शाल, श्रीफळ देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्या मंदिरचे प्राचार्य श्रीकांत जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार राजू कवडीवाले यांनी केले. सायंकाळी भुसावळ येथील शैलेंद्र ठाकूर व त्यांचे सहकारी यांचे सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील सरकारी वकील एडवोकेट प्रकाश साळशिंगीकर, एडवोकेट सुनिता खंडाळे, श्री साई राम ट्रॅव्हल्स चे संचालक हितेश गडे, डॉक्टर एस.के. वाणी, येथील व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष रमाकांत देशपांडे,कांचन गजेश्वर, नगरसेवक पराग सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments